Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : KETU Point , Kati-Awasari
KETU Point , Kati-Awasari
Details in Marathi
के.टू.पाँईट
( काठी अवसरी )
हिमालय पर्वतासारखे पसरलेले काठी अवसरी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगा , यामधून वाकडे-तिकडे साद घालणारे कोयना
धरण , शिवसागर जलाशयातील अथांग पसरलेले पाणी , या पाण्यात सह्याद्री पर्वतावर हिरवेगार डोलणारे कोयना अभयारण्याचे प्रतिबिंब
म्हणजे हिमालय पर्वतातील काश्मिरच होय.
काठी अवसरी के.टू. पाँईटकडे जाताना सह्याद्री पर्वतावर पसरलेला आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्पाच्या पंख्यांचा
आवाज म्हणजे प्रत्यक्ष घोंगावणारा वारा येथे अनुभवता येतो .
के.टू. पाँईटवरून शिवसागर जालाशयाबरोबर दिसणारा हिरव्यागार घनदाट जंगलातील निसर्गरम्य परिसरातील डोंगरामागे सायंकाळच्या
वेळेला लपणारा सूर्य पाहताना स्वर्गाहूनही सुंदर हि भूमी वाटल्याशिवाय राहणार नाही.
या के.टू. पाँईटवरून शिवसागर जलाशयापर्यंत पर्यटकांना उतरण्यासाठी रोपवे साकारण्याची संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची
आहे. येथून पर्यटकांना शिवसागर जलाशयातून लाँचने तापोळावरून महाबळेश्वरला जाता येणार आहे.
याठिकाणी पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस बांधण्यात आले असून के.टू. पाँईट पाटणपासून ३० कि.मी. अंतरावर तर कोयनानगरपासून
लाँचने १२ कि.मी. अंतरावर येते .