Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : ShivSamarath Fort ,Deravan
ShivSamarath Fort ,Deravan
Details in Marathi
शिवसमर्थ गड ( डेरवण )
अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले पर्यटनस्थळ म्हणजे शिवसमर्थ गडातील शिवसृष्टी होय.
संत सीताराम बुवा वालावलकर यांच्या स्मृतीकरीता निर्माण केलेले हे शिल्प शिवरायांच्या संपूर्ण जीवनाची चित्रमय ओळख
करून देणारे आहे. छ. शिवरायांविषयी त्यांच्या मनात असलेल्या आदराला तुलना नाही. याच आदरभावनेतून शिवसमर्थ गडाची
कल्पना निर्माण झाली. गणेशर पारकर या प्रतिभासंपन्न कलावंताने आपले सारे कौशल्य पणाला लावून तिला तेथे मूर्त स्वरुपात
आणले. या अवर्णनीय कलाकृतीच्या निर्मितीस तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला. या गडावर शिवरायांचा नामकरण सोहळा ,
अफजलखानाचा वध ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे हुबेहूब शिल्प शिल्पकार गणेश पारकर यांनी केलेल्या शिल्पांचे कौतुक करावे
तेवढे थोडेच आहे. शिवसमर्थ गडापासून पाटण तालुक्यातील भैरवगड व प्रचिती गडाचे सहज दर्शन होते.
कोयनेपासून चिपळूण-रत्नागिरी मार्गावर ५२ कि.मी. अंतरावर डेरवण येथे शिवसमर्थ गडाचे ठिकाण आहे.