Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Dashbhuja Laxmi-Ganesh Temple , Hedavi - Guhagar
Dashbhuja Laxmi-Ganesh Temple , Hedavi - Guhagar
Details in Marathi
दशभूज लक्ष्मी - गणेश मंदिर , हिद्वी - गुहागर
कोयना पर्यटन परिसरापासून जवळचा समुद्रकिनारा म्हणजे गुहागर आणि हिद्वी येतो. चिपळूणपासून केवळ ४५ कि.मी.
अंतरावर प्रसिद्ध दशभूज लक्ष्मी - गणेश मंदिर आणि विलोभनीय अफाट पसरलेला स्वच्छ , सुंदर अरबी समुद्र किनारा आहे.
हिद्वीच्या एका टेकडीवर दशभूज गणपती मंदिर ठुमदार आणि आकर्षक स्वरुपात नाविन्यपूर्ण बांधण्यात आले आहे.
नव्यानेच हिद्वी दशभूज लक्ष्मी - गणेश मंदिर प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. मंदिर परिसर इतका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला
आहे कि पर्यटकांचे मन येथे विरंगुळल्याशिवाय राहत नाही.
मंदिरापासून ५ मिनिटाच्या अंतरावर सुंदर अरबी समुद्र किनारा आहे. समुद्रकिनाऱ्याशेजारी शंभू महादेवाचे असलेले छोटे
मंदिर समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यच वाढवून जाते.