9226984661 / 9822259514
contact@koynatourism.com
Koyna Tourism
A/P- Patan , Tal -Patan , Dist-Satara

Welcome!

Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar

Tourist Point : Wind Mill , Vanakusawade

Wind Mill , Vanakusawade

Details in Marathi

आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प

पाटण तालुका म्हंटल कि निसर्ग सौंदर्याचे नवे दालनच पर्यटकांना डोळ्यासमोर दिसू लागले आहे. अफाट पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा भव्य पवनऊर्जा प्रकल्प निसर्गाच्या उंच शिखरावर डोलाने आपली पाती फिरवत उभा आहे. कोणतेही पिक अथवा गवत न उगवणाऱ्या पठारावरील सरासरी १ हजार एकर जमिनीमध्ये २ हजार पवनचक्कीची पाती , १२५० कि.व‌ॅट क्षमतेच्या वाऱ्याच्या जोरावर फिरत असून यापासून १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे . या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी सहभाग घेतला असून हजारो हेक्टर परिसरातील डोंगर कपारीत आदिवाशी जीवन जगणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. पवनऊर्जा कंपनीच्या माध्यमातून येथे दळणवळणाच्या सोयीसह येथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा मोफत पुरवली जाते. पाटणमधून सहज नजरेस पडणारा पवनऊर्जा प्रकल्प पाटणपासून काही अंतरावर आहे. एकदा या प्रकल्पाच्या सानिध्यात गेले कि पाचगणीच्या टेबललँडलाही मागे टाकणाऱ्या या वनकुसवडे पठारावरून सह्याद्री पर्वताच्या अफार पसरलेल्या पर्वतरांगांसह शिवसागर जलाशयाचा नजराना पर्यटकांच्या नजरेस येतो . तर पवनचक्कीच्या पात्याआड सूर्योदय व सूर्यास्त पाहताना खरोखरच नवीन काही तरी पाहिल्याचा आनंद येथे जाणवतो . या प्रकल्पासाठी उच्च टेक्नोलॉजीचा वापर करून इंटरनेट सेटलाईट सेवेद्वारे पुणे , मुंबईसारख्या शहरातील मुख्य कार्यालयातूनच प्रकल्पाचे नियंत्रण राखले जाते हे वैशिष्ट्य ठरले आहे. प्रदूषण मुक्त असणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पाने जागतिक पर्यावरणामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.


Copyright © 2016 | koynatourism.com
Developed by Shri Software Solutions & Training Center , Patan