9226984661 / 9822259514
contact@koynatourism.com
Koyna Tourism
A/P- Patan , Tal -Patan , Dist-Satara

Welcome!

Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar

Tourist Point : Ozarde Water-Fall , Koynanagar

Ozarde Water-Fall , Koynanagar

Details in Marathi

ओझर्डे धबधबा व नौकाविहार

कोयनानगरपासून केवळ १० कि.मी. च्या अंतरावर सह्याद्री पर्वतावरून सरासरी ३५० मीटर उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. धबधब्याखाली अंघोळ करणे हि एक पर्यटकांसाठी वेगळीच मजा आहे. धबधब्याजवळ जाण्यासाठी २५ मिनिटे घनदाट जंगलातून पायी चालत जावे लागते . खळखळणाऱ्या पाण्याचे संगीत ऐकत जात असताना जंगलातील एक वेगळी सफर केल्याचा आनंद येथे येतो . या धबधब्यावर शासनाचा वीजनिर्मिती करण्याचा नियोजीत प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे उन्हाळ्यात देखील ओझर्डे धबधबा पर्यटकांना पहावयास मिळणार आहे. कोयना धरणाच्या विस्तीर्ण जलाशयामध्ये आपण नौका विहाराचा आनंद लुटू शकता . कोयना धरणाच्या या अथांग जलाशयामध्ये नौकाविहार करताना जलचर प्राण्यांचे विविध प्रकार आपणास पहावयास मिळतील . कोयना काठावर अभयारण्यातील सांबर , डुक्कर , वाघ , चित्ता , बिबट्या , गावारेडा यासारखे श्वापद प्राणी पिण्यास आलेले क्वचित दिसतील .


Copyright © 2016 | koynatourism.com
Developed by Shri Software Solutions & Training Center , Patan