9226984661 / 9822259514
contact@koynatourism.com
Koyna Tourism
A/P- Patan , Tal -Patan , Dist-Satara

Welcome!

Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar

Tourist Point : Vasota Fort , वासोटा किल्ला

Vasota Fort , वासोटा किल्ला

Details in Marathi

Vasota Fort , वासोटा किल्ला

गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध असलेला पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आज पर्यटकांच्यात वासोटा किल्ला प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून जाता येते. हा प्रवास म्हणजे पर्यटकांसाठी शिवसागर जलाशयातील नौकाविहाराचा वेगळाच आनंद देऊन जातो. या प्रवासात कोयना धरण होण्याअगोदर शिवसागर जलाशय अंतर्गत असणाऱ्या गावांचे अवशेष आजही पर्यटकांना पाहायला मिळतात. तर सह्याद्री पर्वताच्या पठारावर उभ्या असलेल्या पवनचक्कींची पाती पर्यटकांना साज घालताना दिसतात.
लौंच किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर येथून पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी घनदाट जंगलातून पायी प्रवास सुरु होतो. सुरुवातीलाच वाटेत पूर्वीचे हनुमान , गणेश मंदिर पडलेल्या अवस्थेत आढळते. मंदिरापासून किल्ल्यावर २ तासांची पायी चढण जंगलातून चढावी लागते. किल्ल्यावर गेल्यानंतर प्रथम शिवकालीन पाण्याची टाकी पाहायला मिळते. हि टाकी विशेष पद्धतीने बांधली असून या टाकीत बारमाही पाणी असते. येथून पुढे २ मिनिटांच्या अंतरावर छोटेसे मंदिर असून येथे भव्य जाथ्याचा गोल आकाराचा कोरलेला दगड पाहायला मिळतो. या मंदिराच्या डाव्या बाजूस कोकणबाजूला भव्य दरी असून पूर्वी शत्रूंना येथे कडेलोट केला जात असे. वासोटा किल्ला प्रवास भ्रमंतीत पर्यटकांनी जेवणाचे साहित्य बरोबर न्यायला हवे. याशिवाय किल्ल्यावर वनभोजनाचा आनंद लुटता येत नाही.


Copyright © 2016 | koynatourism.com
Developed by Shri Software Solutions & Training Center , Patan