Welcome!
Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by KoynanagarTourist Point : Koyna Dam , Koynanagar
Koyna Dam , Koynanagar
Details in Marathi
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी - कोयना धरण
गुलाबी थंडीचा सुखद आनंद लुटण्यासाठी थंड हवेचे नवीन हिल स्टेशन - कोयना परिसर ( नवीन महाबळेश्वर ) पर्यटकांना या परिसरात भेट देण्यायोग्य निसर्ग सौंदर्याने नटलेली प्रेक्षणीय स्थळे , तीर्थक्षेत्र व भव्य प्रकल्प .निसर्गसौंदर्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोयना नदीचे उगमस्थान महाबळेश्वरपासून ६४ किलोमीटर अंतरावर कोयानानदीवर देशमुखवाडी येथे कोयना धरण बांधण्यात आले. सन १९१० ते १९१५ या काळात ब्रिटीश सरकारची संकल्पना असलेले कोयना धरण स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली १९६२ साली पूर्णत्वास आले . याच कोयना धरणातील अफाट जलसाठ्यावर चार टप्प्यात भव्य वीजनिर्मिती साकारून २००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली.
हि वीज महाराष्ट्रासह शेजारील राज्यात वापरली जाते. त्याचबरोबर कोयना धरणातील पाण्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यातील शेतजमीन सिंचनाखाली आणून शेती सुजलाम-सुफलाम करण्यात आली आहे. म्हणूनच कोयना धरणाला महाराष्ट्राचे भूषण व भाग्यलक्ष्मी संबोधले जाते.