Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Shri Ram Temple , Chaphal
Shri Ram Temple , Chaphal
Details in Marathi
श्री राम मंदिर , चाफळ
श्रीराम मंदिर चाफळ
श्री रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या चाफळ भूमीत श्री समर्थ यांनी
चाफळ येथे १६४८ साली श्रीराम मंदिर स्थापित केले आहे.
चाफळ येथील भव्य श्रीराम मंदिर हिंदुस्थानात श्रीराम भक्तांचे श्रधास्थान झाले आहे.
निसर्गरम्य परिसरात असलेल्या श्रीराम मंदिराच्या अगदी जवळून उत्तरमांड नदी वाहते .
मंदिर परिसरातच समर्थांची ध्यानगुंफा आणि समर्थस्थापित ११ मारुतीपैकी श्री दास मारुती ,
वीर मारुती ,खडीचा मारुती हि मंदिरे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व श्री रामदास स्वामी यांची प्रथम भेट झालेल्या
ठिकाणी शिंगणवाडी येथे श्री शिवसमर्थ प्रथम भेट स्मारक आहे.
चाफळला येणाऱ्या प्रत्येक श्रीराम भक्त व पर्यटकांनी शिंगणवाडी येथील श्री शिवसमर्थ प्रथम भेट
स्मारक समर्थस्थापित मारुतीच्या मंदिरांना भेट दिली नाही तर चाफळची सहल
व भटकंती पूर्ण होत नाही.
चाफळ येथे जाण्यासाठी पाटण येथून सडावाघापूर मार्गे १४ कि.मी. अंतराचा जवळचा मार्ग आहे.