Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Ramban Tirth-Kshetra
Ramban Tirth-Kshetra
Details in Marathi
रामबाण तीर्थक्षेत्र
निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यात पुण्यातीर्थ लाभलेली आहेत .
हे पर्यटकांचे भाग्याच म्हणावे लागेल . ओझर्डे धबधब्यापासून केवळ अडीच ते तीन कि.मी. अंतरावर रामबाण तीर्थक्षेत्र आहे.
याठिकाणी श्रीराम , सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी भटकंती करत होते. त्यावेळी ते नवजा जंगलात पोहचले .
चालून-चालून थकलेल्या सीतेला वाटेत तहान लागली . यावेळी सीतेने श्रीरामांकडे पाणी पिण्यासाठी हट्ट धरला . या घनदाट जंगलात कोठे पाण्याचा माग लागत
नव्हता . अशावेळी श्रीरामांनी जंगलातील एका मोठ्या दगडावर बाणाचा प्रहार केला . त्यावेळी त्या दगडातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला . सीता आणि लक्ष्मणाने प्रसन्न
होऊन या पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि तेथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात केली .
अशी रामायण काळातील दंतकथा रामबाण तीर्थाविषयी सांगितली जाते. आजही हा रामबाण तीर्थ असणारा पवित्र दगड नवजाच्या जंगलात पर्यटकांना पहावयास मिळतो.
याठिकाणी रामनवमीला गावकरी उत्सव साजरा करतात.या उंच दगडात बाणाच्या प्रहराप्रमाणे आकार असून या बाणातून सहज ग्लासने पाणी काढता येते .
येथील वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या अवतीभोवती कोणताही पाण्यासाठी पाझर नाही , अथवा पाण्याच्या समांतर रेषेवर जमिनीचा आधार नाही. उभ्या असलेल्या दगडावर
जमिनीपासून ६ फुटाच्या अंतरावर या दगडात बारा महिने थंडगार पाणी असते . हे पाणी येथे येणारे पर्यटक व रामभक्त भक्तिभावाने रामबाण तीर्थ म्हणून प्राशन करतात.