Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Sundargad Fort (GheraDategad)
Sundargad Fort (GheraDategad)
Details in Marathi
सुंदरगड ( घेरादातेगड )
तलवारीचा आकार असेलेली विहीर घेरादातेगड पाटणच्या वायव्येस केवळ ३ मैलावर सह्याद्रीच्या
उंच शिखरावर आहे. याला दुसरे नाव गंतगिरी व सुंदरगड असेही म्हटले जाते.
किल्ल्यावर जाण्यासाठी जाईचीवाडी वनकुसवडे मार्गे वाहनाने १४ कि.मी. अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी
जाता येते . किल्ल्याच्या पायथ्यालाच निसर्गरम्य परिसरात पाटणचे ग्रामदैवत भैरीदेवीचे मंदिर आहे.
किल्ल्यावरील प्रमुख अवशेष म्हणजे भव्य तलवारीचा आकार असलेली खडकातील विहीर तसेच महादेव , गणपती आणि हनुमानाचे
मंदिर हे होय . किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली विहीर मूळ आयताकृती आहे. पण नंतर तिला मुठीसह
तलवारीचा आकार दिला आहे . विहिरीच्या पायथ्याच्या बाजूने अखंड खडकात खोदलेल्या एकूण ४१ पायऱ्या आहेत . विहिरीच्या
मध्यभागी पश्चिम बाजूस महादेवाचे मंदिर खोदले असून त्याचा आकार सुमारे ८ फुट लांब , ७ फुट रुंद व ६ फुट उंच आहे.
विहिरीतील पाण्याची खोली किती हे सांगता येत नाही.
तलवार विहिरीच्या जवळच खडकात खोडलेले गणपती व मारुतीचे मंदिर आहे.मंदिर पूर्ण उघडे असून त्याच्यावर आच्छादन नाही .
खडकात चौकोनी आकाराच्या खोदकामात उत्तर भिंतीवर दक्षिणाभिमुख गणपती व पूर्व भिंतीवर पश्चिमाभिमुख मारुती अश्या मूर्त्या
आहेत. मंदिराच्या पश्चिम बाजूला दगडात कोरलेली कमान व भुयारी मार्ग आहेत . येथील वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदय होत असताना सूर्यकिरण
गणपतीवर येते . तर सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्याची किरणे मारुतीवर येत असतात. अशा रचनेत खोदलेले हे मंदिर पूर्व इतिहासातील
शिल्पकलाकारांची बौद्धिकता जाणवून देते.
विहिरीच्या उत्तरेस ५ टाक्या बांधकाम खोदलेल्या अवस्थेत आढळतात. येथे घोड्यांचा तबेला असावा अथवा धान्याचे कोठार असावे
असा अंदाज व्यक्त केला जातो .
निसर्गरम्य परिसरात असलेल्या या किल्ल्यावरून कोयनानदीचे नागमोडी आकाराचे विहिंगमय दृश्य दिसते.
याशिवाय भैरवगड , किल्लेमोरगिरी , पवनचक्की प्रकल्प , या परिसरात पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगा यांचे सहज दर्शन होत
असून किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त हे सुद्धा न्याहाळता येतात.