Details in Marathi
भैरवगड किल्ला
सातारा रत्नागिरीच्या सीमा रेषेवर पाटण तालुक्यात कोयनानगर पासून २०कि.मी.
अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतमाथ्यावर घनदाट जंगलाच्या निसर्गसानिध्यात शिवकालीन भैरवगड आहे.
गडावरून कोकणाची नयनरम्य सौंदर्यसृष्टी पाहता येते .
गडावर भैरवनाथाचे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांचा
पूर्णाकृती पुतळा आहे .मुख्य गड मंदिरापासून कोकणबाजूच्या समोरच्या टेकडीवर आहे.
गडावर जाण्यासाठी अवघड पायवाट असून ढासळलेल्या बुरुजांचे अवशेष आहेत .
बुरुजावरून सह्याद्री पर्वताच्या रांगांचा विशेष नैसर्गिक ठेवा पहायला मिळतो .
गडावर टेहळणी गुहा असून या गुहेपर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे .
सध्या गुहेत जाता येत नाही .गडावर शिवकालीन पडक्या वाड्याचे अवशेष आहेत .
गडाचा मार्गावर उभ्या कड्यात भुयारी पद्धतीने खोदलेले थंड पाण्याचे कुंड आहे.
भैरवगडाकडे पायी भ्रमंती करण्याचा आनंद तर वेगळाच आहे. हेळगाव .मेंढेघर ,नाव पाथरपुंज ,
या गावामार्गे भैरव गडाकडे जाता येते.
गडाच्या परिसरातून पाटण येथील गुणवंत गड,घेरा दतेगड,सहज नजरेस पडतात.
गडाच्या कोकण पायथ्याशी पात्रे,माजुत्तरी,रातअंबे,तळावडे,बल्लारमाच,धनगरवाडा,गोऊळ
हि चिपळूण तालुक्यातील गावे असून पाटण तालुक्यातील पातरपुंज,नाव या गावांचे
गडावरील भैरवनाथ हे देवस्थान आहे.