Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Parashuram Temple ,Pedhe-Chiplun
Parashuram Temple ,Pedhe-Chiplun
Details in Marathi
परशुराम ( पेढे चिपळूण )
विष्णूचा सहावा अवतार आणि सप्तचिरंजीवांपैकी एक भगवान परशुराम ख्यातकिर्त आहेत. पाटण तालुक्यातील हेळवाक परिसरात
जगद्गनी ऋषी आणि रेणुका यांच्या पोटी अक्षय तृतीया यादिवशी परशुरामांचा जन्म झाला. भृगू ऋषीच्या कुळातला म्हणून
त्यांना भार्गवरामही म्हणतात. कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा तो तारणहार बनला. समुद्र मागे हटवून स्वतःसाठी अपरांत प्रांताची
( कोकणभूमी ) निर्माण केली आणि अपरांताचा स्वामी बनून तो महेंद्र पर्वतावर स्थायिक झाला. चिपळूणजवळील पेढे गाव
या परशुरामाच्या मंदिरामुळे पेढे परशुराम म्हणून प्रसिद्ध पावले. मंदिराच्या आजूबाजूला असलेली दाट झाडी यामुळे हे ठिकाण
अगदी आवर्जून पाहावे असे आहे. कोयनापासून मुंबई-गोवा महामार्गावर ५४ कि.मी. अंतरावर पेढे परशुराम हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे
या मार्गावर जाता-येता ते केव्हाही पाहता येण्याजोगे आहे.