9226984661 / 9822259514
contact@koynatourism.com
Koyna Tourism
A/P- Patan , Tal -Patan , Dist-Satara

Welcome!

Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar

Tourist Point : ShivSamarath Pratham Bhet , Chaphal

ShivSamarath Pratham Bhet , Chaphal

Details in Marathi

शिवसमर्थ प्रथम भेट , चाफळ

श्री रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि त्यांच्या कार्य कर्तुत्वातून साकारलेल्या श्रीराम मंदिरामुळे चाफळला जसे महत्व आहे , तसेच समर्थ रामदास स्वामी व छ. शिवाजी महाराज यांच्या प्रथम भेटीमुळे शिंगणवाडीला आहे. चाफळपासून केवळ २ कि.मी. अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे समर्थ आणि छत्रपती या दोन महामानवांची प्रथम भेट खडीचा मारुती येथे वैशाख शु.|| ९ शके १५७१ (८/४/१६४९) रोजी झाली . या भेटीमुळे शिंगणवाडी पावन झालाच त्याच बरोबर या भेटीत समर्थांनी शिवरायांना दिलेल्या काही कानगोष्टींमुळे मराठी स्वराष्ट्राचे चित्रच पालटून गेले. या ऐतिहासिक भेटीच्या जागी उचित असे संगमरवरी अष्टकोनी श्री शिवसमर्थ प्रथम भेट स्मारक मंदिर उभे झाले आहे.


Copyright © 2016 | koynatourism.com
Developed by Shri Software Solutions & Training Center , Patan