Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Mahalaxmi Temple , Patan
Mahalaxmi Temple , Patan
Details in Marathi
पाटणची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवी
निसर्गरम्य परिसरात पाटणची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीचे मंदिर , पाटणच्या उत्तरेस एका बाजूला छोट्याशा टेकडीवर
निसर्गाच्या सहवासात उभे आहे. मंदिरापासून चहुबाजूला निसर्गाचा सहवास असून केरा नदीचे उगमस्थान ते केरा-कोयना नदीचा
पवित्र संगम येथून नजरेस येतो.
याठिकाणी नव्यानेच मंदिर परिसर सुशोभित करण्यात येत असून येथे भव्य गार्डन उभारण्यात येत आहे.
अशा या लक्ष्मीमातेच्या परिसरात थोडावेळ निवांत क्षण मनाला सुखद गारवा देणारा आहे. पाटणच्या लक्ष्मीदेवीची यात्रा हि
तालुक्यातील शेवटची यात्रा असून या काळात मान्सूनच्या पावसाची चाहूल लागलेली असते.
पाटण शहर मुळातच निसर्गाच्या सहवासात असून शहराच्या उत्तरेस केरा नदीच्या प्रवाहाशेजारी श्री लक्ष्मीदेवीचे मंदिर , दक्षिणेस
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना-केरा नदीच्या संगमालगत महादेवाचे मंदिर , पूर्वेला ब्राह्मणपुरी येथे श्री विट्ठल-रुक्माई मंदिर
तर पश्चिमेला रामापूर येथे श्री समर्थस्थापित हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरांच्या मधोमध पाटण शहर वसलेले आहे.