Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Ram-Ghal , Sadadadholi
Ram-Ghal , Sadadadholi
Details in Marathi
रामघळ ( सडादाढोली )
चाफळपासून जवळच असलेल्या डेरवण ( सडादाढोली ) येथील निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या
डोंगरावर समर्थांनी रामघळीची निर्मिती केली. या घळीत श्रीराम आणि दासमारुती या मूर्तींची स्थापना करून समर्थ येथे
श्रीरामाचा जप ध्यानस्त बसू लागले. म्हणून या घळीला रामघळ असे संबोधले जाते. या रामघळीपासून १ कि.मी. अंतरावर
कुबडीतीर्थ पाण्याचा झरा आहे. या तीर्थाबाबत असे सांगितले जाते कि , श्री समर्थ रामघळ येथे जात असताना तहानलेल्या
समर्थांना पाण्याची आवश्यकता भासू लागली. आसपास कोठेही पाणी दिसेना म्हणून समर्थांनी हातातील जप कुबडी श्री रामाचे
नाव घेऊन जमिनीवर मारली. त्याठिकाणी अपोआप पाणी वाहू लागले. ते पाणी आजही ३५० वर्षानंतर १२ महिने वाहत आहे.