Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Shri Kshetra Walmiki Temple
Shri Kshetra Walmiki Temple
Details in Marathi
तीर्थक्षेत्र वाल्मिकी
श्रीराम जयराम जय जय राम | या जपाने मंत्रमुग्ध झालेल्या श्री वाल्मिक ऋषी यांच्या वास्तवाने पावन झालेल्या आणि
श्रीरामपुत्र लाव-कुश यांचे रामायण घडलेल्या श्री वाल्मिक ऋषी यांची तपोभूमी पाटण तालुक्यात येते.
हि खरोखरच रामभक्त व पर्यटकांच्या भाग्याची गोष्ट आहे.
चांदोली अभयारण्याजवळ असलेले श्री तीर्थक्षेत्र वाल्मिक हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस येत आहे.
या ठिकाणी जेव्हा वाल्या कोळी येथील घनदाट जंगलात वास्तव्य करून निरपराध लोकांचा बळी घेत होता.
त्यावेळी तेथे नारदमुनी यांनी निरपराध लोकांच्या बळीत पापी झालेल्या वाल्या कोळीला पापमुक्त होण्यासाठी राम नाम जपाचा मंत्र
देऊन पापमुक्त होण्याचा संदेश दिला. तेव्हा वाल्या कोळी रामनाम जपात १२ वर्षे असताना त्याच्या शरीराभोवती जे वारूळ तयार
झाले ते ठिकाण म्हणजेच श्री तीर्थक्षेत्र वाल्मिक.
या ठिकाणी आजही या वारुळाचे पाषाण वाल्मिक मंदिरात पाहायला मिळतो. श्री वाल्मिक मंदिराच्या पाठीमागे ५० मीटर
अंतरावर पवित्र वांग नदीचे उगमस्थान आहे. मंदिराच्या पश्चिमेला चांदोली अभयारण्यात १५ मिनिटांच्या पायी प्रवासानंतर
जेथे श्री वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिले ते केकतीबन हा दगड आहे.
मंदिराच्या पाठीमागील बाजूस संत चोखोबा मंदिर असून मंदिरासमोर त्यांचे समाधीस्थळ आहे. या समाधीला पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर
प्रत्यक्ष संत चोखोबांनी जेथे समाधी घेतली त्याठिकाणी जाता येते हे वैशिष्ट्य आहे.
वाल्मिक याठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. येथे मुक्काम करून
सकाळच्या तांबडप्रहरी होणारा सोर्योदयाचा सुंदर देखावा पाहिल्याशिवाय वाल्मिकी सहल पूर्ण होणे शक्यच नाही. वाल्मिकला
येताना वाटेत तीर्थक्षेत्र बनपुरीच्या नाईकबाला जाणे विसरू नये.